DR. RAJESH SURVASE’S PATENT BASED ON AGRICULTURE PUBLISHED BY THE BRITISH GOVERNMENT AND THE PATENT WAS ALSO GRANTED A GRANT BY THE UK GOVERNMENT.

हार्दिक अभिनंदन

आपल्या एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. राजेश सुरवसे यांचे शेतीवरील पेटंट ब्रिटिश सरकारकडून प्रकाशित करण्यात आले व सदर पेटंटला UK सरकारने अनुदान देखील मंजूर केले.

स्मार्ट प्लॅंन्ट मॉनिटरिंग सिस्टीम ही प्रणाली त्यांनी विकसित केली असून यामध्ये वनस्पतींच्या आरोग्याचे निरीक्षण आणि नियंत्रण करणारे सेंसर तंत्रज्ञान वापरले आहे..

या प्रणालीद्वारे बदलते हवामान आणि जमिनीतील आर्द्रतेची पातळी इ. डेटा संकलित करून त्याचे मूल्यांकन केले जाते व आपल्या मोबाईलवर त्याची सर्व माहिती पाठविली जाते तसेच वनस्पतीच्या नुकसानाचे इशारेदेखील वापरकर्त्याला पाठविले जाते.

स्मार्ट प्लॅंन्ट मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये तापमान सेन्सर, ओलावा सेंसर आणि आर्द्रता सेंसर वापरलेले आहेत जे जमिनीतील अंदाजे तापमान, ओलावा आणि आर्द्रता मोजतात त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी वापरण्यास मदत होते. म्हणजेच जास्त अथवा कमी सिंचन टाळले जाते.

सदर प्रणाली उत्पादन वाढवण्यासाठी आणि पर्यावरणीय दुष्परिणामाचा प्रभाव कमी करण्यासाठी व वनस्पतींचे आरोग्याचे अचूक निरीक्षण करण्याची एक महत्त्वाची पद्धत असून, याच्या आधारे शेतीतील पाण्याची पातळी, मातीची गुणवत्ता आणि रोगजनक किंवा कीटकांच्या उपस्थितीचे सतत निरीक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे एकूणच उत्पादन वाढवण्यास मदत होते.

डॉ. राजेश सुरवसे यांचे आतापर्यंत भारत सरकारकडून 37 पेटंट प्रकाशित करण्यात आलेले असून त्यातील चार पेटंटला अनुदान मंजूर झालेले आहे.

डॉ. राजेश सुरवसे यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!

Date: January 10, 2024