महाविद्यालयास श्रीलंका व पॅलेस्टाईन विद्यापीठातील तज्ज्ञांची भेट व डॉ सुरवसे यांच्या “मानवी भूगोल” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
वरवंड ग्राम शिक्षण संस्थेच्या एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयास श्रीलंका व पॅलेस्टाईन मधील भूगोल तज्ज्ञांनी भेट दिली. कोलंबो, श्रीलंका येथील केलानिया युनिव्हर्सिटी चे सोशल सायन्स विषयाचे डीन व भूगोल विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. अमरसिंघे सर, पॅलेस्टाईन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. मुंथर सर व सॅलीसबरी युनिव्हर्सिटी व स्टॅन्डफोर्ट युनिव्हर्सिटी चे एमिनेटेड प्रोफेसर डॉ. प्रवीण सप्तर्षी या विदेशी तज्ज्ञांनी सोमवार, दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयातील विविध विभागांची माहिती घेतली. यावेळी महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील डॉ.राजेश सुरवसे यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे उपस्थित विदेशी तज्ज्ञांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
महाविद्यालय जरी ग्रामीण भागातील असले तरी विकासाच्या उच्च पातळीवर असल्याचे प्रोफेसर अमरसिंगे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. तसेच श्रीलंकेतील केलानिया युनिव्हर्सिटी व एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय वरवंड यांच्यामध्ये टीचर रिसर्च सेंटर निर्माण केले जाईल व भविष्यात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण निर्माण करण्याकरिता “फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम” व “स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्राम” ही संकल्पना त्यांनी मांडली. सदर योजनेअंतर्गत दिवेकर महाविद्यालयातील प्राध्यापक व श्रीलंकेतील प्राध्यापक हे एकमेकांच्या संशोधनांचे व शैक्षणिक विचारांचे आदान प्रदान करतील व यातून नवीन व शाश्वत संशोधनाची निर्मिती होईल याविषयी त्यांनी विचार मांडले. महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांना व चार प्राध्यापकांना त्यांनी अभ्यासदौऱ्याकरीता श्रीलंकेमध्ये येण्याकरिता निमंत्रित केले आहे. याशिवाय भारत व श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक, भौगोलिक एकतेविषयी त्यांनी विचार मांडले
पॅलेस्टाईन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ मुंथर सर व सॅलीसबरी युनिव्हर्सिटी चे एमिनेटेड प्रोफेसर डॉ प्रवीण सप्तर्षी सर यांनी त्यांच्या मनोगतात संस्थेचे व महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संजयअण्णा दिवेकर, संस्थेचे विश्वस्त आदरणीय अंकुश भाऊ दिवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे, उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर, माळशिरस महाविद्यालयाचे डॉ. संतोष माने, डॉ. सुनील पाचरणे भूगोल विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय दुर्गाडे, महाविद्यालयातील सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विदेशी पाहुण्यांनी महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील असोसिएट एन.सी.सी ऑफिसर कॅप्टन डॉ.मंगेश पालवे व सर्व एन.सी.सी चे कॅडेट्स व पायलट्स यांचे विशेष कौतुक केले
उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले, कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने डॉ. राजेश सुरवसे यांनी केले.
| Date: | January 20, 2025 |
